Ad will apear here
Next
केसरीवाडा गणपती..


ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांच्या केसरीवाड्यातील गणपती हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी पाचवा गणपती आहे. त्या गणपतीबद्दल...
.........
जनतेने एकत्र यावे या भावनेतून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आता गणेशोत्सव महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक सोहळाच बनला आहे. पुणे शहर तर या आपल्या भव्यदिव्य उत्सवासाठी  प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणेशोत्सवातील मानाच्या गणपतींपैकी केसरीवाड्यातील गणपती हा मानाचा पाचवा गणपती आहे.

केसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून केसरीवाड्यात १८९४ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक त्या वेळी विंचूरकर वाड्यात राहत होते. त्यानंतर १९०५पासून केसरीवाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. केसरीवाड्यातील गणपतीची मिरवणूक आजही पालखीतून काढण्याची परंपरा जपली गेली आहे.

लोकमान्य टिळक त्या वेळचे देशातील प्रमुख नेते होते. त्यांनी गणेशोत्सवाला सामाजिक भान दिले. हा उत्सव साजरा करण्यासाठी विविध जागृतीपर कार्यक्रम होऊ लागले. ही परंपरा आजही कायम आहे. गणेशोत्सवादरम्यान येथे विविध व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशमूर्तीची स्थापना टिळक पंचांगाप्रमाणे होते. १२४ वर्षांपासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आपले वेगळेपण केसरीवाडा गणेशोत्सवाने जपले आहे.

केसरीवाडा गणपतीची मूर्ती कायम स्वरुपी चांदीची असून त्यांची स्थापना दहा वर्षापूर्वी करण्यात आली, ती ज्ञानेश्वरीतील वर्णनाप्रमाणे घडवण्यात आली आहे. या मूर्तीला सहा हात आहेत. मूर्तीच्या एका हातात मोदक असून, दुसरा हात आशीर्वाद देत आहे. अन्य हातांपैकी एका हातात परशू, पाशांकुश, एका हातात चंद्र आणि एका हातात हस्तिदंत आहे. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सनी ही मूर्ती घडवली आहे. या मूर्तीसमोर मातीची उत्सवमूर्ती बसवली जाते. दर वर्षी गोखले हे पुण्यातील मूर्तिकार ही मूर्ती घडवतात.

पहिल्या दिवशी ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांचे आगमन होते. यंदा श्रीराम ढोलपथक बाप्पासमोर आपली कला सादर करणार आहे. तसेच ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक आणि सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या वेळी डॉ. गीताली टिळक-मोने, डॉ. प्रणती टिळक व केसरी परिवार उपस्थित राहणार आहे.

केसरीवाडा हे अनेक ऐतिहासिक घडामोडींचा वारसा जपलेले ठिकाण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून रोज दुपारी भजनी मंडळ येते. कार्यक्रमानिमित्त आलेल्या कलाकारांच्या हस्ते आरती केली जाते. केसरीवाड्याच्या गणपतीवर अनेकांची आस्था, श्रद्धा आहे. अनेक राजकीय पुढारी, सिनेमासृष्टीतले कलाकार दर्शनासाठी एक भाविक म्हणून दरसाल येथे हजेरी लावतात.

या वर्षी केसरीवाडा गणपतीला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी गिफ्ट रॅपिंग, पाककृती, पुष्परचना व फुलांची रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, क्ले मॉडेलिंग, नाट्यछटा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गणेश उपासना आणि आधुनिक जीवन, हिंदी चित्रपटातील गझल या कार्यक्रमांचे, तसेच चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत पानसुपारी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZBHBF
Similar Posts
श्री कसबा गणपती लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी १८९३मध्ये पुण्यात सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्षे होत आहेत. त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. काळानुसार या सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले असले, तरी श्रद्धा कायम आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यनगरीतल्या मानाच्या
उत्सवातील कोहिनूर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्याच्या गणेशोत्सवातील जणू कोहिनूरच ठरला आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण पुण्याचा गणेशोत्सव बघायला केवळ देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही लोक येतात. पुण्यात आलेला कोणीही गणेशभक्त दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुणे सोडतच नाही, हेही तेवढेच सत्य आहे. या गणपती मंडळाबद्दल
मंडईतला शारदा गजानन पुण्यातील गणेशोत्सवामध्ये जी महत्त्वाची मंडळे आहेत, त्यापैकी एक म्हणजे अखिल मंडई मंडळ. शारदा गजाननाची सुरेख मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य. या मंडळाबद्दल...
‘वेदा’तर्फे शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्ट (वेदा) यांच्या वतीने विविध शाळांचे मुख्याध्यापक व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०१९’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार डॉ. दीपक टिळक यांनी प्रदान केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language